घरातून १० हजारांची रोकड लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रिंगरोडवरील फॉरेस्ट कॉलनीतील एका घरातून अज्ञात चोरट्याने १० हजारांची रोकड आणि बँकेतील लॉकरची चावी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रूपाली मुकेश पुर्णपात्रे वय ४१ रा. फॉरेस्ट कॉलनी, रिंगरोड, जळगाव या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. २१ जानेवारी रोजी रात्री ८ ते २२ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरातून अज्ञात व्यक्तीने १० हजारांची रोकड आणि बँकेतील लॉकरची चावी चोरून नेल्याचे समोर आले.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर रूपाली पुर्णपात्रे यांनी संपुर्ण शोधाशोध केली परंतू या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवारी २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कमलेश पवार हे करीत आहे.

Protected Content