मतदार यादी संदर्भात गुरूवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सोबत बैठक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात सध्या १ जानेवारी,२०२४ च्या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (Special Summary Revision) राबविण्यात येत आहे. याबाबत जिल्ह्यातील खासदार, आमदार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासोबत २३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. मतदार याद्या संदर्भात नागरिकांना शंका असल्यास निवडणूक शाखेशी संपर्क साधावा. असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जळगांव जिल्ह्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाच्या कालावधीत नाशिक विभागीय आयुक्त किमान तीन भेटी देऊन तपासणी करणार आहेत. विभागीय आयुक्तांचा प्रथम दौरा २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी जिल्हास्तरावरील तसेच सर्व मतदार नोंदणी अधिकारी विधानसभानिहाय तपासणी करणेत येवून मतदान केंद्रांची भेट घेणार आहेत.

मतदार यादीसंदर्भात नागरिकांना कोणत्याही शंका/ समस्या असल्यास ते उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याशी 92092 84010 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात. असे आवाहन श्री.चिंचकर यांनी केले आहे.

Protected Content