अन्यायासमोर कधीही झुकणार नाही’ – राहुल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । ‘जगात कुणालाही घाबरणार नाही आणि अन्यायासमोर कधीही झुकणार नाही’ अशा शब्दांत राहुल गांधी यांनी ट्विटरवर देशाला गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पोलिसांकडून रस्त्यातच अटक करण्यात आलेल्या राहुल गांधींनी मागे हटणार नसल्याचंच सूतोवाच या ट्विटमधून केलंय.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज देशवासियांना गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरुवारी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांच्यासोबत हाथरस सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी यांना रस्त्यात अडवण्यात आलं होतं

नोएडातल्या यमुना एक्सप्रेस – वेवर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नोएडा प्रशासनानं त्यांच्याविरुद्ध महामारी कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल केला त्यानंतर गुरुवारी सायंकाळी सर्व ताब्यात घेण्यात आलेल्या काँग्रेस नेत्यांना सोडण्यात आलं.

मी असत्यावर सत्यानं विजय मिळवेन आणि असत्याचा विरोध करताना सर्व कष्ट सहन करू शकेन’ गांधी जयतीच्या शुभेच्छा, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय.

गुरुवारी नाट्यपूर्ण घटनाक्रमात राहुल गांधी आणि पोलिसांचा आमना-सामना झाला होता. राहुल गांधींना जोरदार धक्का लागल्यानंतर ते जमिनीवर कोसळले होते. त्यांच्या हातालाही दुखापत झाली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाननं राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांना ताब्यात घेतलं होतं.

यावेळी ‘तुम्ही मला अटक का करत आहात? कोणत्या आधारावर अटक करण्यात येतेय? मी कोणत्या कायद्याचं उल्लंघन केलंय?’ असा प्रश्न राहुल गांधी यांनी अधिकाऱ्यांना केला. यावर ‘कलम १८८ नुसार सरकारी आदेशांची अवहेलना करण्याच्या आरोपाखाली अटक’ असल्याचं अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं.

Protected Content