वाघ नगरात बंद घरफोडून ९० हजारांचा ऐवज लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाघ नगर परिसरातील साई संस्कार कॉलनी येथे बंद घराचा दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवार ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. यासंदर्भात सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सलीम मेहबूब तडवी (वय-५८) रा.साई संस्कार कॉलनी, वाघ नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत असतात. रविवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा बारा ते दुपारी तीन वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश करत घरात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच ४० हजार रुपयांची रोकड असा एकूण ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर सलीम तडवी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे आहे.

Protected Content