घरातून महिलेची मंगलपोत लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवारात घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत महिलेच्या घरात प्रवेश करुन चोरट्यांनी १४ हजारांची १४ ग्रॅम वजनाची मंगलपोत लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवार, १५ सप्टेंबर रोजी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील निमखेडी शिवारात गुरुप्रसाद अपार्टमेंट येथे राजश्री सतीश चव्हाण वय ४० हे वास्तव्यास आहेत. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्याने घरात प्रवेश करुन घरातून महिलेची १४ हजारांची १४ ग्रॅमची मंगलपोत लांबविली. प्रकार समोर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी तालुका पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय भालेराव हे करीत आहेत.

Protected Content