दोन लाख रूपयांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह चौघांवर गुन्हा

vivahitra chad

जळगाव प्रतिनिधी । जळगाव येथील माहेर आणि शिरसोली येथील सासर असलेल्या 23 वर्षी विवाहितेचा पतीसह सासरचे मंडळींनी प्लॉट घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपयांसाठी शारिरीक आणि मानसिक छळ केला. याप्रकरणी पतीसह चौघांविरोधात रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका उर्फ माई प्रदीप पाटील रा. गुरूदत्त हौसिंग सोसायटी, गिरणा पंपीग रोड जळगाव यांचे शिरसोली येथील प्रदीप उर्फ बापु सुभाष पाटील यांच्याशी 8 मे 2015 रोजी लग्न झाले. त्यावेळी विवाहितच्या वडीलांनी लग्नासाठी दीड लाख रूपये रोख दिले होते. लग्नानंतर मुलगा ध्रुवेश (वय-2) झाला. त्यानंतर विवाहितेला माहेरहून दोन लाख रूपये घेवून यावे यासाठी शारिरीक व मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. दरम्यान प्रदीपला दारूचे व्यसन जडले होते. दारूच्या नशेत अनेक वेळा मारहाणही करण्यास सुरूवात केली. याला सर्व गोष्टीला सासू कोकीळाबाई सुभाष पाटील, नणंद सुरेख संदीप सुर्वे, नणंद आशाबाई संदीप सुर्वे आणि संदीप श्रीराम सुर्वे नंदोई यांनी देखील प्रोत्साहन दिले. त्यानंतर विवाहितेच्या अंगावरील सर्व दागिने काढून 10 ऑगस्ट 2017 रोजी घरातून हाकलून दिले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात पती प्रदीप उर्फ बापु सुभाष पाटील, सासू कोकीळाबाई सुभाष पाटील, नणंद सुरेख संदीप सुर्वे, नणंद आशाबाई संदीप सुर्वे आणि संदीप श्रीराम सुर्वे नंदोई यांच्याविरोधात रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content