गाळेधारकाकडून लाच स्वीकारांना महापालिका कर्मचारी अटकेत

जळगाव प्रतिनिधी । गाळ्याचा कर कमी करण्यासाठी ४१०० रूपयांची लाच स्वीकारतांना आज महापालिका कर्मचार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील पिंप्राळा परिसरात असणार्‍या गाळेधारकाला कर कमी करून देण्यासाठी विलास भिका पाटील (वय ५५,) या महापालिका कर्मचार्‍याने ४१०० रूपयांची लाच मागितली होती. दरम्यान, तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. यानुसार संबंधीत कर्मचार्‍याला सापळा रचून अटक करण्यात आली.

ही कारवाई मार्गदर्शन अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस अधिक्षख सुनिल कडासने व अप्पर अधिक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व डीवायएसपी जी.एम.ठाकुर यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या निलेश लोधी, संजोग बच्छाव, पोना.मनोज जोशी, पोकॉ.प्रशांत ठाकुर, पोकॉ. प्रविण पाटील, नासिर देशमुख, पोकॉ.ईश्‍वर धनगर, पोहेकॉ.सुरेश पाटील यांच्या पथकाने केली.

Protected Content