चोपडा महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

चोपडा प्रतिनिधी । येथील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षनिमित्ताने महाविद्यालयात येत्या दि.२१ रोजी दुपारी ४ वाजता स्मार्ट क्लास रुम, प्रतापगड इमारत येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

१९६९ साली महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. स्थापनेपासून ते आजपर्यंत महाविद्यालयाचा प्रगतीचा आलेख वाढतच आहे. तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात दैदीप्यमान अशी यशस्वी महाविद्यालय करत आहे. यासोबतच सामाजाची व राष्ट्राची देखील तत्परतेने सेवा महाविद्यालय करत आहे. आपल्या आयुष्याच्या महत्वपूर्ण जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे महाविद्यालय आता सुवर्ण महोत्सव वर्ष साजरे करीत आहे. तसेच या दीर्घ प्रवासाचे साक्षीदार म्हणून या महाविद्यालयाचा वतीने मेळावा आयोजित करण्यात येत आहे.

महाविद्यालयाचा यशाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थींना मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
याप्रसंगी मेळाव्यासाठी महाविद्यालयाचे व प्राणीशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी, शास्त्रज्ञ डॉ. वसंत जाधव (उपाध्यक्ष, अलँनम फार्मासिटीकल, अमेरिका ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून म.गा.शि.म.चे अध्यक्ष अँड.संदिप पाटील उपस्थित राहणार आहेत. तरी या माजी विद्यार्थी मेळाव्यास सर्व माजी विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डि.ए.सुर्यवंशी व माजी विद्यार्थी मेळावा प्रमुख डॉ.पी.एस.लोहार यांनी केले आहे.

Protected Content