चोपडा शहरातील एका महिलेचा विनयभंग

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरातील एका भागात राहणाऱ्या २३ वर्षीय महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याच्या घटना घडली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा शहरातील एका भागात २३ वर्षीय महिलाही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १२ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता महिलाही घरी एकटी असताना तिच्या घरात घुसून शेख अलीम शेख इसामुद्दीन (वय-२७) हा तिचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी महिलेने चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार चोपडा शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शेख अलीम शेख इसामुद्दीन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप भोई करीत आहे.

Protected Content