जळगाव महापालिका कर्मचाऱ्याचा आकस्मात मृत्यू

Crime

जळगाव प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेतील पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा कामावर असतांना हृदयविकाराच्या तिव्र झटका आल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, संतोष लोटन ठाकूर (वय-57) रा. खोटेनगर पाण्याच्या टाकीजवळ हे जळगाव महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागात काम करतात. आज सकाळी 11 वाजता कामावर असतांना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. ते शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी प्रणेश ठाकूर यांचे काका होत. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, मुलगा व विवाहित मुलगी असा परीवार आहे.

Protected Content