वृद्धाने राहत्या घरात घेतला टोकाचा निर्णय

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे राहणाऱ्या ६८ वर्षीय वृद्धाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार ४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता समोर आले आहे. या संदर्भात रात्री १० वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुरेश सिताराम साळुंखे वय-६८, रा. मेहुणबारे ता. चाळीसगाव असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

मेहुणबारे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे गावात सुरेश सिताराम साळुंखे हे वृद्ध आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. गुरुवार ४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांनी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. ही घटना नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना खाली उतरवून तातडीने मेहूणबारे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Protected Content