ट्रेंडींगच्या नावाखाली शिक्षकाची तब्बल ३४ लाखांची फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| शहरातील फॉरेस्ट कॉलनीत राहणाऱ्या एका शिक्षकाला ‘ट्रेडींग’मध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांची तब्बल ३४ लाख १६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी सायंकाही जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगावच्या फॉरेस्ट कॉलनीतील शिक्षक अनिल पांडुरंग दांडगे (वय- ४३) हे कुटूंबासह वास्तव्यास आहेत.१८ डिसेंबर २०२३ ते आजपावेतो ‘इंडिया वेदरवेन (११)’ या ग्रुपवरील डॉ. आर्यन रेड्डी व ट्रेडींग अॅडर्व्हटायझर निता मोदी यांच्या मोबाईल नंबरवरुन आलेल्या मॅसेज धारकाने ट्रेडींग इन्व्हेस्टमेंट करण्याच्या बहाण्याने ३४ लाख १६ हजार रुपये इतकी रक्कम विश्वास संपादन करून मिळवली. मात्र, कुठलाही परतावा न दिल्याने फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर ४ एप्रिल रोजी अनिल दांडगे यांनी जळगाव सायबर पोलिसात तक्रार नोंदवली. आर्यन रेड्डी व निता मोदी यांच्या विरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसननजन पाटील हे तपास करत आहेत.

Protected Content