Home Cities जळगाव डॉ. मधुलिका सोनवणेंनी स्वीकारला विद्यापीठाच्या प्रभारी वित्ताधिकारीपदाचा कार्यभार

डॉ. मधुलिका सोनवणेंनी स्वीकारला विद्यापीठाच्या प्रभारी वित्ताधिकारीपदाचा कार्यभार

0
108


जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी वित्त व लेखा अधिकारीपदाचा कार्यभार विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या प्राध्यापिका डॉ. मधुलिका अजय सोनवणे यांनी स्वीकारला आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी वित्त व लेखाधिकारी सोमनाथ गोहिल यांनी गत आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर या पदाचा प्रभार कुणाकडे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर विद्यापीठाच्या प्रभारी वित्त व लेखा अधिकारीपदी विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या प्राध्यापक डॉ. मधुलिका अजय सोनवणे यांची नियुक्ती प्रभारी कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन यांनी केली आहे. यानंतर मंगळवारी प्रा. सोनवणे यांनी हा पदभार घेतला. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, प्रा.मोहन पावरा, प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound