जळगाव प्रतिनिधी । अवैधरित्या विनापरवाना तीन जनावरांना कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या वाहनास आज पहाटे काही तरूणांच्या सतर्कतेने पकडून शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी शहर पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
याबाबत माहिती अशी की, कांचन नगर येथील रंहिवासी राजेंद्र नन्नवरे आणि समाधान पाटील हे दररोज सकाळी कांचन नगर ते दुध फेडरेशन रनिंग व शतपावली करतात. आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास शिवाजी नगर स्मशानभूमीजवळ एका चाकचाकी छोटा हत्ती गाडी क्रमांक (एमएच12 जेएफ 1295)तून काही गुरांचा आवाज येत होता. यावेळी हा आवाज या दोन तरूणांना ऐकला. त्यांना सदरील गाडी थांबवून गाडीची चौकशी केली असता त्यात दोन बैल आणि एक गाय मिळून आली. याबाबत चालकास विचारपुस केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. वाहनांची वाहतूक करण्याबाबत कोणतेही कागदपत्र आणि गाडीचे देखील कागदपत्र उपलब्ध नव्हते. दरम्यान दोन्ही तरूणांना गाडी बसून गाडी थेट शहर पोलीसात दाखल केली. पोलिसांनी 30 हजार रुपये किमतीचे दोन बैल, 20 हजार रुपये किमतीची गाय, दील लाख रुपयांची चारचाकी असा एकूण 2 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. चालक मयुद्दीन इसुफ पठाण, व गुरे मालक संजू बिस्मिल्ला पटेल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी शहर पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.