ब्रेकींग : खासगी बसचा भीषण अपघात; तीन प्रवाशी गंभीर जखमी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गिरणा पुलाच्या जवळ मंगळवारी सकाळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी बस पलटी झाल्याने भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नसली तरी तीन प्रवाशी गंभीर जखमी झाली आहे.

याबाबत अधिक असे की, चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटातील अपघाताची घटना ताजी असतांना आज मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा सकाळी चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळ खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली.  धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी खाजगी बस ((क्र. जीजे ०१ इटी ९९०६) ) अहमदाबाद (गुजरात) येथून औरंगाबादच्या दिशेने जात होती. दरम्यान चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळ आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने गावाजवळील गिरणा पुलाच्याजवळ जुन्या मोरावर बस रस्त्याखाल उतरल्याने पटली झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. मात्र तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिक गावकऱ्यांनी धाव घेवून मदत केली.

दरम्यान अपघात घडल्याची माहिती मिळताच मेहूणबारे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. व याप्रकरणी मेहूणबारे पोलीस स्थानकात नोंद झाली असून सहायक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

 

Protected Content