वर्षा बंगल्यातील भिंतीवर ठाकरेंचा तिरस्कार करणारा मजकूर ; राजकीय चर्चांना उधाण

thakarey

 

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्रातील सत्ता हातातून गेल्यामुळे माजी मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सध्या सोशल मिडीयावरून आपली नाराजी आणि उद्विग्नता सातत्याने मांडत आहेत. त्यात आता वर्षा बंगल्याच्या भींतीचीही भर पडली असून बंगल्यातील भींतींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा तिरस्कार करणारा मजकूर लिहिण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांणा उधाण आले आहे.

राज्यातील सत्ता बदलानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांसह वर्षा बंगला सोडला. नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अद्याप तिथं राहायला गेलेले नाहीत. मात्र, त्याआधीच वर्षा बंगल्यातील रंगलेल्या भिंतींचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरून राजकारणही रंगलं आहे. या भिंतींवर देवेंद्र फडणवीस रॉक्स… यूटी इन मीन (यूटी वाईट आहेत), भाजप, भाजप असंही लिहिण्यात आलं आहे. ‘यूटी’ म्हणजे नेमकं कोण?; यावरून आता तर्कवितर्क लावले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावाचं इंग्रजीतील संक्षिप्त रूप ‘यूटी’ असं होतं. त्यामुळं हे त्यांनाच उद्देशून असल्याची चर्चा आहे. मात्र, ते नेमकं कोणी लिहिलं? हे व्हिडिओ चित्रण कुणी केलं आणि ते कसं व्हायरल झालं, याबाबत काहीही कळू शकलेले नाही.

Protected Content