धरणगाव येथे ‘अधिकृत पत्रकार संघा’च्या वतीने ‘पत्रकार दिन’ उत्साहात साजरा

धरणगाव, प्रतिनिधी | दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन येथील विश्रामगृहात उत्साहात साजरा करण्यात आला.

देशात दरवर्षी ६ जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने येथील विश्रामगृहात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष ऍड. वसंतराव भोलाणे, शहराध्यक्ष लक्ष्मण माळी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे सदस्य ऍड.वसंतराव भोलाने, लक्ष्मण माळी, कडू महाजन, धर्मराज मोरे, भगीरथ माळी, बी.आर.महाजन, जितेंद्र महाजन, आर.डी. महाजन, अविनाश बाविस्कर, बाळासाहेब प्रभूदास जाधव, सतीश शिंदे, विनोद रोकडे, योगेश पाटील, दिनेश पाटील, धनराज पाटील, लक्षमण पाटील, पी.डी. पाटील, राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

Protected Content