लोहाऱ्यातील तिघांना सु-लक्ष्मी बहुउद्देशी संस्था व माणुसकी समूहाचा सेवा गौरव पुरस्कार जाहीर

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मराठवाड्यातील सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूहाने वेगवेगळे क्षेत्रात काम करणाऱ्या लोहारा गावातील तिघांच्या कामाची दखल घेऊन  त्यांना सेवा गौरव पुरस्कार जाहीर केला आहे. तिघांना हा पुरस्कार ३० डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे प्रदान करण्यात येणार आहे.

 

औरंगाबाद येथील सु – लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह रुग्णालय घाटी यांनी खानदेशातील जळगाव जिल्हा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तिघांच्या कामाची दखल घेऊन पुरस्कार जाहीर केला आहे.  पुरस्कार हा सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी समूह यांच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुक्रवार ३० डिसेंबर २०२२  रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र, टी.व्ही. सेंटर, औरंगाबाद येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारामध्ये लोहारा ता. पाचोरा येथील ज्येष्ठ नागरिक कवी मंगलदास मोरे यांना कला क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कला क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यांचा कवितासंग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे. तसेच लोहारा येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते दिपक वामन पवार यांना सामाजिक क्षेत्रात विधायक काम केल्याबाबत सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच रॅपिड ॲक्शन फोर्स (सी. आर. पी. एफ.) मध्ये मुंबई येथे सेवा देत असलेले लोहारा येथील जवान चंद्रकांत वसंत गीते यांना सुद्धा सामाजिक क्षेत्रात विधायक काम केल्याबद्दल सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव  पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ते ड्युटीवर असतांना देश सेवा तर करतातच परंतु सुट्टीवर आल्यावर सुद्धा समाजाची आपल्या हातून सेवा व्हावी या निस्वार्थ उद्देशाने विविध सामाजिक उपक्रम घेऊन समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य करीत आहेत.

मराठवाड्यातील सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूहाने वेगवेगळे क्षेत्रात काम करणाऱ्या लोहारा गावातील म्हणजे ग्रामीण भागातील मंगलदास मोरे, दिपक पवार, चंद्रकांत गीते यांची सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचे व माणुसकी रुग्णसेवा समूहाचे अध्यक्ष सुमित पंडित व निवड समिती यांनी निवड केल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Protected Content