नगरदेवळा येथे विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात

पाचोरा, प्रतिनिधी ।  पाचोरा तालुक्यातील  नगरदेवळा येथे  विविध ठिकाणी ७५ वा स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

नगरदेवळा ग्रामपंचायत कार्यालय, सरदार एस. के. पवार विद्यालय, जिल्हा परिषद उर्दू शाळा, ए. टी. गुजराथी कन्या शाळा, पोलीस दुरक्षेत्र यासह विविध ठिकाणी ७५ वा स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर सरदार एस. के. पवार विद्यालयात सकाळी  मानद चिटणीस शिवनारायण जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच सौ. प्रतीक्षा किरण काटकर यांच्या हस्ते करण्यात आले. जि. प. उर्दू शाळेत ग्रामपंचायत सदस्य शेख वसीम अहमद गुलाम यांच्या हस्ते, कन्या शाळेत ग्रामपंचायत सदस्य आर. बी. महाजन यांच्या हस्ते तर पोलीस दुरक्षेत्र नगरदेवळा येथे सहाय्यक फौजदार कैलास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य,  ग्रामशिक्षण समितीचे सदस्य, पोलीस कर्मचारी, मुख्याध्यापक, पत्रकार बांधव, प्रतिष्ठित नागरिक, मराठी उर्दु शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

Protected Content