खामगाव तालुक्यातील भुमापनाची ड्रोनव्दारे सर्वेक्षणास सुरुवात

खामगाव प्रतिनिधी । भारतीय सर्वेक्षण विभाग डेहरादून, महसूल विभाग व भूमी अभिलेख, ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील 135 गावातील घरांच्या जागांचे गावठाणातील मिळकतीचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.  त्यानुसार आज खामगाव तालुक्यातील आवार या गावात आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्य हस्ते ड्रोनचे पुजन करुन भुमापनास सुरुवात करण्यात आली.

खामगांव मतदार संघातील गावठाणातील ड्रोनव्दारे भुमापनाचे सर्वेक्षणास आज खामगांव विधानसभा मतदार संघाचे लाडके व तरुण तडफदार आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या हस्ते खामगांव तालुक्यातील मौजे आवार येथे ड्रोनचे पूजन करुन शुभारंभ करण्यात आला.                    आज मतदार संघातील टेंभुर्णा, माथणी, कारेगांव बु, शिरजगांव देशमुख, माक्ता, कोक्ता, जयपूर लांडे, वाडी, सुटाळा बु., पिंप्री गवळी, हिंगणा उमरा, चितोडा, अंबिकापूर, आवार या गांवाचे सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे.  ड्रोनव्दारे भुमापन करणे व मिळकत पत्रिकांचे स्वरुपात त्यांचे मालकी हक्काबाबत दस्त ऐवज उपलब्ध करुन देणे हा महत्वांकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत असून त्यांची सुरुवात आज झाली आहे. त्यासाठी कर आकारणी रजिस्टरची सॉफट कॉपी व हार्ड कॉपी उपअधिक्षक भुमिअभिलेख कार्यालयास पुरविण्यात आली आहे.

यावेळी  पंचायत समिती सभापती रेखा युवराज मोरे, पंचायत समिती सदस्य,शरदचंद्र गायकी, राजेश तेलंग पंचायत समिती सदस्य, हरसिंग साबळे, भगवानसिंग सोळंके, युवराज मोरे, तहसिलदार अतुल पाटोळे, आर एस खरोटे उपाधीक्षक भूमीअभिलेख, गटविकास अधिकारी राजपूत, ताज नदाख, ड्रोन अधिकारी सर्वे ऑफ इंडीया भारत सरकार, के एल दास येलूमलाई, ड्रोन अधिकारी, सर्वे ऑफ इंडीया भारत सरकार, अनुभव मिश्रा,  आशा दिलीप गवई सरपंच, उपसरपंच अरुण मांजरे, विश्वनाथ वैतकार, केशरबाई मधूकर अंभोरे, शेख इरफान, पुरुषोत्तम पुंडकर, दिलीप बोंद्राजी गवई, गणेश खराटे, साबळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक सतिष देवचे यांची उपस्थिती होती.  तर कार्यक्रमाचे संचलन प्रदिप मधूकर अंभोरे यांनी केले

 

Protected Content