शासकीय कारवाईबाबत भेदभाव का ? : दीपककुमार गुप्ता यांचा सवाल

जळगाव प्रतिनिधी । अगदी सकाळी फिरणार्‍यांसह विवाहात नियमांचे उल्लंघन झाले म्हणून दंडात्मक कारवाई करणारे प्रशासन अंत्यसंस्काराला उसळलेल्या गर्दी नंतरही कारवाई करत नसल्याने हा भेदभाव का ? असा प्रश्‍न सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी विचारला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

याबाबत वृत्त असे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी गफ्फार मलिक यांचे परवा रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर काल दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी हजारोंचा जनसमुदाय त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाला होता. अंत्यसंस्काराला जळगाव शहरासह जिल्ह्यातील मान्यवर नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती सुध्दा होती. https://livetrends.news यात फिजीकल डिस्टन्सींगच्या फज्जा उडाला होता. तसेच सध्या सुरू असणार्‍या कडक निर्बंधांचे उल्लंघन करण्यात आले होते. यामुळे प्रशासन या प्रकरणी कारवाई करणार का ? असा प्रश्‍न माहिती अधिकार कार्यकर्ते तथा सोशल अ‍ॅक्टीव्हीस्ट दीपककुमार गुप्ता यांनी तातडीने ट्विटरवरून प्रशासनाला विचारला होता. यात त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही टॅग केले आहे.

दरम्यान, कालच एका विवाह समारंभात नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारणी करण्यात आली आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना दीपक कुमार गुप्ता म्हणाले की, जळगावात सध्या सुरू असणार्‍या कडक निर्बंधांमध्ये कठोर कारवाई होत असून ती योग्य देखील आहे. प्रशासन अगदी मॉर्निंग वॉक करणार्‍यांवरही कारवाई करत आहे. https://livetrends.news यातच विवाहात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दंड ठोठावणारे प्रशासन अंत्यसंस्कारातील गर्दीबाबत गप्प का बसले आहे ? हाजी साहेब हे सर्वमान्य नेते होते. त्यांच्या निधनामुळे सर्वांप्रमाणे आम्हालाही दु:ख झाले आहे. मात्र नियम हा सर्वांना सारखाच हवा. यामुळे या प्रकरणी कारवाई होणार का ? असा प्रश्‍न दीपक कुमार गुप्ता यांनी विचारला आहे.

Protected Content