खडके बुद्रुक येथे कोरोना लसीकरणाला सुरूवात

एरंडोल प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील खडके बुद्रुक येथी जि.प. शाळेत कोरोना लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. रिंगणगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत हे लसीकरण केले जात आहे.

गेल्या आठ दिवसांपासून शासनाकडून लसीकरण पुरवठा थांबल्यामुळे येथील लसीकरण थांबले होते.  जिल्हा परिषदेचे सदस्य नाना महाजन यांच्याहस्ते १५० जणांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले. यात 45 वर्षाच्या वरील नागरिकांना या लसीचा लाभ मिळाला. ग्रामीण भागात देखील लोक लसिकरणासाठी उत्सुक आहेत, परंतु लसीकरणाचा तेवढा पुरवठा होत नाही. त्यामुळे शासन स्तरावरून लक्ष देण्याची गरज असल्याचे उपस्थितांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रांना नियमित लसीचा पुरवठा केल्यास लसीकरणाच्या वेग वाढेल यामुळे लसीची उपब्धता झाली पाहिजे. याकडे सुध्दा शासनाने लक्ष दिले पाहिजे असे सामान्य नागरिकांना वाटत आहे. लसीकरण करून घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र रिंगणगाव येथील डॉ. अमोल भंगाळे, धीरज मराठे, आरोग्य सहायक संजय ठाकूर, आरोग्य सेविका सुनीता चौधरी, आरोग्य सेवक दगडु परदेशी, प्रेम त्रिवेदी, संजय राजपूत, पी.टी. पाटील, संभाजी पाटील, खडके बु येथील आशा स्वयंसेविका वंदना पाटील, विद्या पाटील यांनी परिश्रम घेतले. यावेळी एरंडोल तालुका शिवसेना विभाग प्रमुख राजु धनगर, उपसरपंच विठठल पाटील, विकासोचे माजी चेअरमन एकनाथ पाटील, चुडामन पाटील, भाऊसाहेब पाटील, ज्ञानेश्वर धुमाळ,किशोर पाटील, सुजित धुमाळ, पत्रकार वाल्मीक पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content