भरधाव क्रुझरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

चाळीसगाव प्रतिनिधी ।  नांदगावकडून चाळीसगावकडे भरधाव वेगात येणाऱ्या क्रुझरच्या धडकेत तालुक्यातील हिरापूर येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, जिभाऊ रामदास पाटील (वय-४१ रा. हिरापूर ता. चाळीसगाव) हे आपल्या दुचाकीवरून (क्र. एम.एच.१९ बीफी.८४९६) हिरापूर रेल्वे स्थानकाकडून हिरापूर गावाकडे येत असताना. समोरून नांदगाव कडून चाळीसगावकडे येणाऱ्या भरधाव क्रुझरने  (क्र. एम.एच.३९ जे. १८१०) ओव्हर टेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार जिभाऊ रामदास पाटील यांचा दुदैवी मृत्यू झाला. घटना घडताच चालक (नाव गाव माहीत नाही) हा पसार झाला. हि घटना २८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास हिरापूर ते चाळीसगाव रोडवरील पांडुरंग पाटील यांच्या शेताजवळ घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात मयताचे मोठे भाऊ विजय रामदास पाटील यांनी भादवी कलम ३०४ (अ) व २७९ या कलमान्वये अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास एच.सी./२३४३ भालचंद्र पाटील हे करीत आहेत.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.