कासोदा येथे दूध डेअरीत चोरी : १५ हजारांची रोकड लंपास (व्हिडीओ)

kasoda chori

कासोदा, प्रतिनिधी | येथील ईश्वर माधवराव पाटील यांच्या मेनरोड लगत, महादेव मंदीर गल्लीतील किरण दुग्धालय या दुकानात आज (दि.२०) पहाटेच्या सुमारास १२ ते १५ हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नेहमीप्रमाणे डेअरीचे कामकाज आटोपून रात्री १०.०० वाजता डेअरी बंद करण्यात आली व सर्व कर्मचारी घरी गेले. तद्नंतर सकाळी ४:१५ च्या सुमारास येथे चोरी झाली. सकाळी डेअरी उघडण्यासाठी आलेला कर्मचारी साफसफाई करत असतांना त्याच्या लक्षात ही चोरी आली. त्यात दोन दिवसांचे पेमेंट होते ते घेऊन दुकानाच्या वरच्या मजल्यातून आलेल्या एकट्या चोराने मोबाईल टॉर्चच्या साहाय्याने चोरी केल्याचे डेअरी मालक ईश्वर पाटील यांनी सी.सी.टी.व्ही.फुटेजद्वारे बघितले व पोलिसांत फोन करून कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी लागलीच धाव घेतली. पुढील तपास सी.सी.टी.व्ही. च्या माध्यमातून रविंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली पो कॉ.जितेश पाटील, माधव पाटील, सहाय्यक फौजदार सहदेव घुले हे करीत आहेत.

कासोद्यात दिवसेंदिवस चोरीचे सत्र सुरू असल्याने व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या गस्तीवर ग्रामस्थांना संशय निर्माण होत आहे. मागील आठवड्यातही एका सराफ दुकानात चोरीचा प्रयत्न एकाहोमगार्डांच्या सतर्कतेमुळे फसला होता. राज्य शासनाने मात्र होमगार्डांना पगार देण्यासाठी निधी नसल्याचे सांगत त्यांना कामावरून थांबवले आहे, जर आज ते होमगार्ड रात्री गस्तीवर असते तर ही चोरी झाली नसती. असे गावातील सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे.

 

 

Protected Content