उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । बसस्थानक आवारात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या एकावर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, बस महामंडळाचे विलीनीकरण व्हावे यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून एस.टी.कर्मचारी हे संपावर आहे. दरम्यान बुधवार ५ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता बसस्थानकाच्या आवारात संपकरी बसलेले असतांना ॲड. सतिष रोठे या व्यक्तीने एस.टी. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे. याबाबत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल अश्लिल शब्दाचा वापर करून बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठपोलीस ठाण्यात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या ॲड. सतिषचंद्र रोठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास जिल्हा पेठ पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content