यावल शहरात मोकाट गुरांचा वावर; नागरीकांची वाढतेय डोकेदुखी

yawalnew

यावल प्रतिनिधी । गेल्या महिन्याभरापासून यावल शहरात मोकाट गुरांचा वावर वाढल्याने नागरीकांची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढत आहे. संबंधित गुरे मालकांना नोटीसा पाठवूनही कोणताही प्रतिसाद मिळून न आल्याने काही गुरू पोलीस स्थानकात बकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी की, नागरीकांच्या तक्रारीवरून शहरात मोकाट गुरांच्या मालकांना पोलीस निरीक्षकांनी नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. यावेळी अनेकांनी कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून पोलीसांनी मोकाट फिरणारे बकऱ्या पोलीस ठाण्यात जमा केले आहे. बकरी मालकांचा शोध घेवून त्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे. तथापी न आल्यास बकरीला कोंडवाड्यात पाठविले जाणार आहे. शहरातील रस्त्यांवर गुरांचा वावर वाढल्याने रस्त्याव दुचाकीचा अपघात होऊन अनेकांना दुखापत झाली आहे. यापुढे कोणत्याही ठिकाणी मोकाट जनावरे दिसून आले तर त्यांच्या दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याच्या सुचना वजा आदेश यावल पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी केले आहे.

Protected Content