७५ हजार किमतीची गुरे चोरीला : गुन्हा दाखल

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील दळवेल येथील शेतकरी लोटन पाटील त्यांच्या सबगव्हान शिवारातील ७५ हजार किमतीचे गुरे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाटील हे ५० हजार रुपये किंमतीचे दोन बैल, १५ हजार रुपये किमतीची एक गावरान गाय, १० हजार रुपये किमतीचे दोन वासरु अशी पाच गुरे मोकळ्या जागेत बांधून आले होते. परंतू दि.१४ नोव्हेंबर रोजी सकाळी पहाटे ते शेतात गेले असता त्यांना गुरे दिसून आली नाहीत. आजूबाजूचे शेजारी यांच्याकडे तपास करून देखील गुरे आज पावेतो मिळून आले नाहीत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज्ञत चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे. दरम्यान तालुक्यात गुरे चोरीच्या घटना या अधून मधून घडत आहेत. या चोरट्यांचा छळा लावावा अशी मागणी पशुधन मालकांकडून होत आहे.

Protected Content