Home राजकीय रावेर येथे मविआतर्फे महायुती सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन

रावेर येथे मविआतर्फे महायुती सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ येथे महाविकास आघाडीतर्फे राज्य सरकारविरुद्ध जोडे मारो आंदोलन करण्यात आले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शिवसेना उबाठाचे तालुकाध्यक्ष अविनाश पाटील आदीं महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हाेते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला कार्यकर्त्यांनी जोडे मारून निषेध व्यक्त केला. यावेळी महायुतीच्या विरोधात भ्रष्टाचारी सरकार व राज्यकर्ते असल्याबाबत घोषणा देवून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, रविंद्र पवार, विनायक महाजन, अशोक शिंदे, रमेश महाजन, दीपक पाटील, संतोष पाटील, सुरेश शिंदे, सुनिल कोंडे, मुबारक तडवी, महेमुद शेख, गोपाल मिस्तरी, तुषार निंबाळकर, आयुब खान पठाण, शेख मंजुर, युसूफ खान, गयास शेख, लक्ष्मण मोपारी, नितीन महाजन, पुर्वेश महाजन, सावन मेढे, धुमा तायडे, भुपेंद्र जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound