जयंत पाटील जळगावात दाखल : सहकार्‍यांसोबत बंद द्वार चर्चा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जळगावात दाखल झाले असून जिल्ह्यातील अंतर्गत कलहाबाबत ते नेत्यांसोबत खलबत करत असल्याची माहिती समोर आली आहे.

जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटातील अंतर्गत कलह उफाळून आला आहे. एकीकडे आ. एकनाथराव खडसे यांनी आपण भारतीय जनता पक्षात जाणार असल्याचे जाहीर केल्याने खळबळ उडाली असतांना रावेरात श्रीराम पाटील यांच्या उमेदवारीला संतोष चौधरी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी विरोध केला आहे. संतोषभाऊंनी तर बंडाचे निशाण फडकावत लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची तयारी देखील सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमिवर, जयंत पाटील हे शरद पवार यांच्या दौर्‍याच्या एक दिवस आधीच जळगावात दाखल झाले आहेत.

आज सकाळी जयंत पाटील यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केल्यानंतर ते जळगावातील एका हॉटेलमध्ये दाखल झाले. येथे त्यांनी स्थानिक नेत्यांसोबत विस्तृत चर्चा सुरू आहे. याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्य रवींद्रभैय्या पाटील, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, रावेरातील पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई पाटील, महानगराध्यक्षा मंगलाताई पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, एजाज मलीक, रमेश पाटील, डॉ. चंद्रकांत बारेला आदींसह पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.

Protected Content