रावेर, प्रतिनिधी | शहरातील मानाच्या गणपतीपासून ढोल-ताशांच्या गजरात आ.हरीभाऊ जावळे यांची भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मिरवणूक सुरु झाली असून त्यानिमित्ताने त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे, ना.गिरीश महाजन, खा. रक्षाताई खडसे, आ. सजंय सावकारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, रिपाई जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चे डॉ. राजेंद्र फडके, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती आहे.