महाविकास आघाडीतल्या धुसफुसीबद्दल राऊतांचं वक्तव्य

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर येऊन महाविकास आघाडीतल्या नाराजीबद्दल आपले मत मांडले. मविआतल्या प्रत्येक मंत्र्याचं हे कर्तव्य आहे की पक्ष न पाहता त्यांनी प्रत्येकाचं ऐकून घेतलं पाहिजे. नाराजी असणं हे सामान्य आहे. त्यासाठी एकत्र बसून सूचना द्यावा लागतील. आपण जर पालकमंत्री असू तर खाली शिवसेना आहे, त्यामुळे त्यांच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. हा सर्वच पालकमंत्र्यांसाठी इशारा आहे”. महाविकास आघाडीतल्या धुसफुसीबद्दल संजय राऊत यांचं वक्तव्य केलंय.

संजय राऊत यांनी म्हटलंय की, एखादा दुसऱ्या पक्षाचा पालकमंत्री असेल तर तो अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करतो. अशा तक्रारी आहेत. यावर तोडगा काढावा लागेल. कारण प्रत्येक मंत्र्यानं फक्त घटक पक्ष नव्हे तर मविआचा घटक म्हणून काम केलं पाहिजे. पालकमंत्री कोणत्याही पक्षाचा असला तरी तिन्ही पक्षांचं काम झालं पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय. हा प्रत्येक पालकमंत्र्यासाठी हा इशारा आहे. सरकार तीन पक्षांचं आहे, हे कुणीही विसरता कामा नये, असंही त्यांनी म्हटलंय.

 

 

Protected Content