तुम्ही किती चिकन घेतलं याकडे भाजपचं लक्ष; ईडीला कळवतील – राऊतांचा टोला

नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । महाराष्ट्रात जपून पैसे खर्च करा, तुम्ही चिकनच्या दुकानात जरी गेलात तर काल किती घेतलं आणि आज किती घेतलं यावर भाजपचं लक्ष आहे. ताबडतोब ते इडीला कळवतील, त्यामुळे सावध राहा, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीत मतदारांना पेटीएमद्वारे एक हजार रुपये देण्यात येत आहे. मतदारांनी हा पैसा घेऊ नये. पैसे वाटप करणाऱ्यांविरोधात आम्ही ईडीकडे तक्रार करणार आहोत. त्यामुळे मतदारांनी पैसे घेऊ नये. नाही तर उगाच अडचणीत याल, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. पाटील यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. भोंगे लावण्याचं चंद्रकांत पाटलांना कळलं. भाजप आपल्या खर्चानं करताहेत. आता तिथेही ईडी लावतील. जशी कोल्हापूरच्या मतदारांच्या मागे लावली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जपून पैसे खर्च करा. तुम्ही भाजीची जुडी जरी विकत घ्यायला गेला तरी, तुमच्यावर भाजपचं लक्ष आहे. तुम्ही चिकनच्या रांगेत गेला तरी किती किलो चिकन घेतलं? किती घेतलं? आज किती घेतलं? यावर भाजपचं लक्ष आहे. ते ईडीला कळवतील. त्यामुळे सावध राहा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भोंगे आणि ईडीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलं. देशात अनेक राज्यात भोंगे उतरलेले नाहीत. भाजपशासित राज्य मोठ्या प्रमाणात भोंगे आहेत. मधल्या काळात गोव्यात होतो. अनेकदा अजान ऐकत होतो. गोव्यात दहा वर्षापासून भाजपचं राज्य आहे. उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी गेलो. उत्तर प्रदेशातील भोंगे आहे तसेच आहेत. काल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यांबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्याचं पालन होणं गरजेचं आहे, असं राऊत म्हणाले.

 

Protected Content