राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर पक्षात नाराजी

पुणे – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीतील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. या प्रकरणामुळे मनसेमध्ये अंतर्गत नाराजीही निर्माण झाली आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या मुद्द्यावरून मनसेतही अंतर्गत नाराजी निर्माण झाली आहे. विशेषत: पुण्यातील मुस्लीमबहुल भागांचे प्रतिनिधित्व करत असलेल्या मनसेच्या नेत्यांमध्ये राज यांच्या भूमिकेविषयी नाराजी असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्या भाषणात मतितार्थच समजलेला नाही. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शांत राहिले पाहिजे. मी माझ्या प्रभागात तरी मशिदींसमोर भोंगे लावणार नाही, असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मी त्यांच्यावर किंवा पक्षावर नाराज नाही, असेही वसंत मोरे यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांचे भाषण आमच्या कार्यकर्त्यांना कळालेच नाही. राजसाहेब म्हणालो होते, मशिदींवरील भोंगे काढले नाहीत तर तिकडे जाऊन लाऊडस्पीकर्स लावा. ‘भोंगे काढले नाहीत तर’, असा राजसाहेबांचा शब्द होता. त्यामुळे मशिदींवरील भोंगे काढण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. त्यामुळे प्रथम राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे वसंत मोरे यांनी म्हटले.

 

 

Protected Content