दहीवद येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मौजे दहीवद येथे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने मंजुर झालेल्या विविध विकास कामांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा माजी जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते पार पडला.

या प्रसंगी जेष्ठ कामगार नेते एल.टी. पाटील, अमळनेर बाजार समिती सभापती अशोक पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, बाजार समिती संचालक भोजमल पाटील, समाधान धनगर, विजय शेकनाथ, शहापूर येथील निलेश पाटील, प्रभारी सरपंच दहिवद देवानंद बहारे, चेअरमन न.भा. विद्यालय जयवंत गुलाबराव पाटील मा.जि.प. सदस्य अशोक पाटील, गटनेता तथा ग्रा.प.सदस्य शिवाजी पारधी, माजी उपसरपंच सुनिल पाटील, बाळू पाटील, शा.व्य.समिती सदस्य अनिल माळी, शिवाजी पाटील, अशोक पाटील, बापू सोनवणे, सुकलाल पारधी, माजी चेअरमन विकासो भटू पाटील, जगदीश पाटील, चंद्रकांत पाटील, अशोक पाटील, सुरेश माळी, रवींद्र माळी, रवींद्र पाटील, पंकज माळी, बाळू माळी, भैया पाटील, कमलेश पवार, भाऊसाहेब धोबी, भूषण शिंदे, आनंदा पाटील, शैलेश पाटील, किरण पाटील, संजय सोनवणे, सपना सोनवणे, सरला बहारे,छाया अहिरे, धनुबाई सोनवणे, सुनीता बहारे आदी उपस्थित होते.

या विकास कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण

यावेळी रा.मा.१५ दहीवद रस्ता सा.क्र. १/५०० ते  ३/०० मजुतीकरण व डांबरीकरण करणे ४७ लाख, निंभोरा ते अमळगाव ई.जा. मा.८१ कि मी ०७/५०० ते ०९/०० भाग रा.मा. दहीवद रस्ता सा. क्र. कि. मा .१७/००  ते २०/०० डांबरीकरण करणे ८० लाख, सामाजिक न्याय अंतर्गत बौध्द विहार बांधकाम करणे  २० लाख, २५१५ अंतर्गत गाव दरवाजा बांधकाम करणे २० लाख या कामांचे भूमिपूजन व लेखाशिर्ष ४०५४/२४१९ रस्ते व पुल दुरुस्ती करणे ५० लाख, आमदार निधी अंतर्गत अहिल्यादेवी चौक सुशोभीकरण करणे ३.०० लाख, MRAGES अंतर्गत गाव लगत रस्ता काँक्रिटकरणं करणे ३० लाख, जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना निर्माण करणे २१० लाख, तलाठी कार्यालय बांधणे २५ लाख, सामाजिक न्याय अंतर्गत रस्ता काँक्रिट करणे ५.०० लाख आदी कामांचे लोकार्पण करण्यात आले.

Protected Content