शिवसेनेला पाठिंब्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून निर्णय घेणार : पवार

sharad pawar new 696x447

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून आम्ही कुठलीही अट घातलेली नाही. पण शिवसेनेच्या पाठिंब्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून निर्णय घेणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

निवडणुकीत महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. यामुळे जो काही निर्णय होईल तो काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मिळून घेतील. पण सत्तास्थापनेवरून आणि मुख्यमंत्रीपदावरून माध्यमांमध्ये ज्या चर्चा सुरू आहेत. त्यात तथ्य नाही. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही पक्षाने कोणासोबत जावे हे एवढे सहज सोपे राहिलेले नाही. यामुळे शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत बैठकीनंतर निर्णय घेऊ. सध्या आमचा कुठलाही निर्णय झालेला नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची मुंबई वाय. बी. सेंटरमध्ये बैठक सुरू झाली. तर दुसरीकडे दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत.

Protected Content