Home राजकीय दिल्लीत पवार व प्रशांत किशोरांची पुन्हा बैठक

दिल्लीत पवार व प्रशांत किशोरांची पुन्हा बैठक

0
103

नवी दिल्ली वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात आज नवी दिल्लीत पुन्हा बैठक होत असल्याने राजकीय वर्तुळात कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी प्रदीर्घ भेट घेतल्याने राजकीय वर्तुळाचे कुतुहल चाळवले होते. या भेटीचा तपशील समोर आला नसला तरी तब्बल साडे तीन तासांपर्यंत या दोन्ही मान्यवरांमधील बैठक ही आगामी राजकीय घडामोडींचे केंद्रस्थान असू शकेल अशी चर्चा रंगली होती. यानंतर आज पुन्हा दिल्लीत या दोन्ही मान्यवरांमध्ये बैठक सुरू झाली आहे.

शरद पवार आज राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठकही करणार आहेत. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह केरळातील काही नेतेही उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्याचवेळी प्रशांत किशोर पवारांच्या 6, जनपथ या निवासस्थानी भेटीला दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


Protected Content

Play sound