जवायाला मारहाण; पत्नीसह 6 जणांविरोधात गुन्हा

Crime 1

जळगाव प्रतिनिधी । पत्नीला घेण्यासाठी सासरी आलेल्या जावाईला पत्नीसह सहा जणांनी मारहाण केल्याची घटना करंज येथे घडली असून याप्रकरणी सहा जणांविरोधात तालुका पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, सुनिल संतोष ठाकरे (वय-29) रा. मायसांगवी ता.यावल व त्यांची पत्नी योगिता सुनिल ठाकरे यांचे गेल्या दोन वर्षांपूर्वी कौटुंबिक वादातून योगीता करंज ता.जि. जळगाव येथे माहेरी राहत होत्या. पत्नीला घेण्यासाठी सुनिल ठाकरे हे 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता गेले असता त्यांना सासरे ज्ञानेश्वर रामकृष्ण सपकाळे, शालक नितीन ज्ञानेश्वर सपकाळे, चुलत सासरे (पुर्ण नाव माहित नाही), चुलत शालक आबा (पुर्ण नाव माहित नाही), सासु सुशिलाबाई ज्ञानेश्वर सपकाळे व पत्नी योगिता ठाकरे यांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील 20 भारचे चांदीचे ब्रेसलेट बळजबरीने हिसकावून घेत खिश्यातील 9 हजार 300 रूपये काढून घेतले तसेच सासरे ज्ञानेश्वर सपकाळे यांनी काठीने डोक्याला मारून जखमी केले. याप्रकरणी सुनिल ठाकरे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि निशिकांत जोशी करीत आहे.

Protected Content