मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

accident5 201905244186

लोणावळा वृत्तसंस्था । मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोल नाक्याजवळ वॅगनर कारला भीषण अपघात झाला आहे. त्यात कार चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत माहिती मिळताच बचाव पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेली ही कार खालापूर टोल नाक्याजवळ असताना पुढे असलेल्या एका वाहनाला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. यात कारचा चालक जागीच ठार झाला. कारमध्ये अन्य कोणीही नसल्याची प्राथमिक माहिती आहे. वाहनाला धडकल्यानंतर ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगला जाऊन धडकली. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकाचे जवान व पोलीस रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले आहेत. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

Protected Content