जवखेडेसिम विकोसोवर निवडून आलेल्या सदस्याचा सत्कार

एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील जवखेडेसिम येथील विकासोवर निवडून आलेल्या सदस्यांचा आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील जवखेडेसिम विविध कार्यकारी सोसायटीच्या १३ जागांसाठी ४ मे रोजी निवडणूक घेण्यात आली. यात सर्वच्या सर्व जागांवर १३ पैकी १३ जागांवर शिवसेनेने विजय मिळवत विकासोवर शिवसेनेचा भगवा फडकविला आहे.

 

यात गोपीचंद बळीराम आमले, ज्ञानेश्वर सखाराम पाटील, हिंमत जयराम चौधरी, हिंमत प्रेमराज पाटील, यादव माधवराव पाटील, कैलास प्रल्हाद पाटील, अभिमन रामदास पाटील, रमेश चिंतामण खेमणार, प्रेमराज वेडु पाटील, मुरलीधर धर्मागिर गोसावी, उत्तम चिंतामण सोनवणे, लिलाबाई सुभाष पाटील, अल्काबाई लोटन पाटील यांनी विजय संपादन केला.

 

या सर्व विजयी उमेदवारांचा व शिवसेना तालुका प्रमुख तथा पॅनल प्रमुख वासुदेव पाटील यांचा आमदार चिमणरावजी पाटील यांनी सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गणेश पाटील, रविंद्र चौधरी,  ज्ञानेश्वर पाटील, मोतीलाल चौधरी, मांगिलाल पाटील,  संजय पाटील पंकज पाटील यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!