हिंमत असेल तर हनुमान चालीसा बंद करून दाखवा – सोमय्या

नवी दिल्ली, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा- भाजपचे किरीट सोमय्या यांनी आज दिल्ली येथे राणा दाम्पत्याची भेट घेतली, त्यांनतर महाविकास आघाडी ठाकरे सरकारवर हिंमत असेल तर हनुमान चालीसा, रामभक्तांचे भजन कीर्तन बंद करून दाखवा, अशी टीका पत्रकारांशी बोलताना केली.

राज्यात भोंगे आणि हनुमान चालीसावरून वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांचे एकमेकांना आव्हान प्रतीआव्हान असे चित्र आहे. भाजपचे सोमय्या यांनी दिल्लीत राणा दाम्पत्याची भेट घेतल्यानंतर ते म्हणाले कि, या महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला मुंबई उच्च न्यायालयाच्या वारंवार चपराक पडल्या आणि आता सुप्रीम कोर्टाची  पण  चपराक पडली आहे , त्यामुळे ठाकरेंचे दोन्ही  गाल चांगलेच सुजले आहेत. पोलीस प्रशासनाचा वापर माफिया प्रमाणे करीत असून वीस फुट खोल गाडण्याची आमदार आणि खासदारांना धमकी देतात, हा चिंतेचा विषय असून सभेमध्ये मर्द असून मर्दासारखे काम करतो असे नेहमी म्हणतात, परंतु महिला खासदाराला जेलमध्ये टाकून चुकीची वागणूक देऊन तुमचा नामर्दपणा दाखवून दिला आहे, असेही ते सोमय्या यांनी म्हटले आहे.

हिंदुस्थानचे कोट्यावधी जनता हनुमानाची पूजा करतात, १४ मे रोजी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत सभा आहे, त्याच दिवशी महाराष्ट्र सरकारविरुद्ध आणि मुख्यमंत्री ठाकरे यांना सद्बुद्धी यावी यासाठी नवी दिल्लीतील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठन आणि आरती करणार असल्याचे राणा दाम्पत्याने जाहीर केले आहे. ठाकरेंध्ये हिंमत असेल तर हनुमानाचे भजन कीर्तन बंद करून दाखवा असा इशारा सोमय्या यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना दिला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!