यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यात एकमेव यावल येथेच साजरा होत असलेला मुस्लिम बांधवांचा जश्ने पेहरन-ए-शरीफ उत्सव आज साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.
खिरनीपुरा उत्सव समितीच्या वतीने साजरा होत असून जश्ने पेहेरन ए शरीफ ची मिरवणूक डांगपुर्या मधून दुपारी चार वाजेला भक्ती गीताचे सुराने (मीलाद) मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. या वर्षात कोणतेही कर्णकर्कश वाद्य मिरवणुकीत वाजवणार नसल्याचा पंच कमीटीने निर्णय घेतला आहे. पेहेरन ए शरीफ निमित्ताने राज्यातील समाजबांधव उपस्थित राहत असल्याने शहरात यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. उत्सवात हिंदू मुस्लिम बांधव, सहभागी होत असल्याने हा उत्सव हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक मानले जाते .
राज्यात यावल येथेच एकमेव जश्ने पेहरन-ए-शरीफ उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला सुमारे १३० वर्षांची परंपरा आहे. उर्दू वर्षानुसार मोहरमच्या १४ तारखेला हा उत्सव साजरा करतात. जश्ने पेहरन-ए-शरीफच्या काढण्यात येत असलेल्या डोलीचे चे हजारो भाविक दर्शन घेतात यासाठी, मुंबई, खंडवा ,धुळे, मालेगाव, जळगाव ,बर्हाणपूर , सुरत आदी शहरासह भाविक येथे उत्सवासाठी उपस्थित राहत असल्याने घरोघरी पाहुण्यांची वर्दळ असते. उत्सवात हिंदू-मुस्लिम बांधवही मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने हिंदू-मुस्लीम एकात्मतेचे दर्शन घडते.
भाविकांसाठी लंगर ( प्रसाद )चे आयोजन लंगर कमिटीच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. समितीने यावर्षी चार क्विंटल तांदळाचा गोड भात करण्याचे आयोजन केले आहे. यानुसार यंदा देखील अन्नदान करण्यात येणार आहे. तसेच जश्ने पेहरन-ए-शरीफ निमित्ताने तीन ऑगस्ट रोजी हिंदू मुस्लिम एकता समितीच्या वतीने येथील चोपडा रस्त्यावरील नदीपात्रात कुस्त्याचा आम दंगल आयोजित केला आहे.
जश्ने पेहरन-ए-शरीफ निमित्ताने बर्हाणपूर, चाळीसगाव, मनमाड, धुळे, भुसावळ, जळगाव ,मालेगाव,मेरठ (उतरप्रदेश ) आदी ठिकाणाहू दंगल मध्ये सदभागी होण्यासाठी कुस्तीपटू मोठ्या संख्येने हजेरी लावणार असल्याचे पहेरहन कमेटीच्या वतीने सांगण्यात आले आहे.