अमळनेरचा सराईत गुन्हेगार स्थानबद्ध : सलग पाचवी कारवाई

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील विशाल चौधरी या गुन्हेगाराला एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले असून या माध्यमातून पोलीस प्रशासनातर्फे सलग कारवाईंचे सत्र सुरूच असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

 

अमळनेर शहरात युवा पिढीला अभ्यासाची व स्पर्धा परीक्षाची आणि रोजगाराची गोडी निर्माण व्हावी अशी दिशा व भविष्याची वाटचाल आहे. परंतु या अमळनेर शहरात बोटावर मोजके काही समाज विघातक कृती करणारे गुन्हेगार यांच्यावर कायद्याचा वचक असावा म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी गुंडागर्दी गुन्हेगारी वृत्तीचे कृत्य करणार्‍या लोकांवर वेळोवेळी कायदेशीर प्रतिबंधक व प्रतिबंधित करारनामा करण्यात आल्या आहेत. या कायदेशीर कारवाईने समाजात धोकादायक व्यक्ती म्हणून वागत असणार्‍या लोकांना एक कायदेशीर जबर चपराक म्हणून अमळनेर शहरातील भयंकर दहशत निर्माण करणारे  ४ सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. च्या ४ वेगवेगळ्या ठिकाणी स्थानबद्धच्या कारवाया करण्यात आल्या आहेत.

 

दरम्यान, यानंतर विशाल दशरथ चौधरी याला देखील एमपीडीए अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे. झामी पोलीस चौकी परिसरातील विशाल दशरथ चौधरी, वय-२७ वर्ष याने गुन्हेगारी कृत्यांमध्ये सन २०१६ पासून ते सन २०२३ च्या ३१ जुलै पावेतो अनेक गुन्हेगारी कृत्य केले. त्यात प्रामुख्याने बनावट विषारी दारू विकणे, शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, लुटमार करून जबर दुखापत करणे तसेच समाजात गुंडागर्दी करून दहशत निर्माण करणे आणि विशेषता हिंदू मुस्लिम जातीय तणाव निर्माण करून दंगल घडविणे असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल झाले आहेत.

 

या अनुषंगाने त्याच्यावर वेळोवेळी चांगला वागणुकीचे व प्रतिबंधक अनेक वेळा कारवाई करण्यात आल्या आहेत. परंतु तो कायद्याला न घाबरता त्याने त्याचे गुंड प्रवृत्तीचे करत असल्याने त्याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टी वाले व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन व्यक्ती आणि वाळू तस्कर तसेच अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणार्‍या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालने बाबतचा अधिनियम १९८१ प्रमाणे विशाल दशरथ चौधरी यास पुणे येथील येरवडा सेंट्रल तुरुंगात एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे.

 

 

या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उप निरीक्षक विकास शिरोळे, अनिल भुसारे, पोलीस अमलदार किशोर पाटील, डॉ. शरद पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील, सिद्धांत सिसोदे, सुनिल रामदास पाटील, घनशाम पवार, कैलास शिंदे, जितेंद्र निकुंभे, चालक मधुकर पाटील, योगेश श्रावण पाटील, सुनिल बभूता पाटील  यांनी कामगिरी बजावली.

Protected Content