जळगावात तरूणीची दीड लाखाची ऑनलाईन फसवणूक; सायबर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी ! ओला कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून २३ वर्षीय तरूणीच्या बॅक खात्यातून अज्ञात व्यक्तीने दीड लाख रूपये काढून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रूची अजय जाखोटे (वय-२३) रा. पिंप्राळा, जळगाव ह्या खासगी नोकरीला आहेत. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ८.३० वाजेच्या दरम्यान त्यांनी एका अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरील व्यक्तीने त्यांचे नाव गाव न सांगता आपण ओला कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे बतावणी करून तुमचे ३१३ रूपये तुमच्या खात्या वर्ग करत असल्याचे सांगितले. अनोळखी व्यक्तीने त्यांनी मोबाईलमध्ये ANYDESK नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. तरूणी ॲप डाऊनलोड केले आणि अज्ञात व्यक्तीने तरूणीच्या मोबाईलवर पुर्ण नियंत्रण मिळविले. अवघ्या काही मिनीटात त्यांच्या बँकेच्या खातून १ लाख ४९ हजार ९९१ रूपये काढून फसवणूक केली. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे तरूणीच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी ३१ नोव्हेबर सायंकाळी ६ वाजता तरूणीच्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

Protected Content