पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानासमोर मध्यरात्री रांगोळी काढून निषेध आंदोलन करणाऱ्या भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यां कारवाई करून गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन युवासेनाच्या वतीने पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाविरोधात भारतीय जनता पक्षाकडून ठरवून विरोध होत आहे. सोमवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरासमोर भारतीय जनता युवा मोर्चाच्या सदस्यांनी लज्जास्पद असा गनीमी कावा करीत रांगोळी टाकून विरोध केला व घोषणाबाजी केली.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या उद्देशाने पोलीस अधिक्षकांनी झालेल्या प्रकारावर त्वरीत गुन्हा दाखल करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन युवासेनेच्या वतीने पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना मंगळवारी १८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता देण्यात आले.

 

यावेळी युवासेना सहसचिव विराज कावडीया,  जिल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील, महानगर युवाधिकारी स्वप्निल परदेशी, विशाल वाणी, उपजिल्हा युवाधिकारी विकास पाटील, तालुका युवाधिकारी सचिन चौधरी, यश सपकाळे,  विधानसभा युवाधिकारी विजय लाड, विभाग प्रमुख निलेश वाघ, राकेश चौधरी, गिरीश सपकाळे, सागर हिवराळे, अमोल मोरे, युवतीसेना उपशहर प्रमुख वैष्णवी खैरनार, अमित जगताप, प्रितम शिंदे, शंतनू नारखेडे आदी उपस्थित होते.

Protected Content