अट्रावल येथील सरपंचांच्या प्रभागातच घाणीचे साम्राज्य

यावल प्रतिनिधी । येथील सरपंचांच्या प्रभागातच घाणीचे साम्राज्य झाले असल्याची तक्रार हेमचंद्र सुपडू चौधरी या दिव्यांग ग्रामस्थाने केली आहे

याबाबतचे वृत्त असे की, अट्रावल सरपंच यांच्या घरासमोरच राहणारे दिव्यांग ग्रामस्थ हेमचंद्र सुपडु चौधरी (वय ४७ ) यांनी ग्रामपंचायतीला आपल्या घरासमोर होणार्‍या घाणी च्या संदर्भात वारंवार लेखी तक्रार देऊन देखील कुठलीही कार्यवाही अट्रावल ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेली नाही.

हेमचंद्र चौधरी हे अट्रावल येथ होळी मैदान या परिसरात जन्मापासून राहात असून त्यांच्या कुटुंबात व्यतिरिक्त कोणीही नसल्याने ते एकटेच राहात असून याच परिसरात राहणारे काही बेजबाबदार मंडळी त्याच्या घरा समोरील व बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत दुर्गंधीयुक्त कचरा टाकत असल्याने होणार्‍या दुर्गंधीचा या दिव्यांग व्यक्तीस बर्‍याच दिवसापासून त्रास होत असून त्याच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आपण सरपंच अट्रावल ग्राम पंचायत यांना लेखी स्वरुपात वारंवार अनेक तक्रारी देवुन देखील ग्राम पंचायत प्रशासनाच्या वतीने कुठल्याच प्रकारची कार्यवाही अथवा नोटीस त्यासंबंधित घाणी चा कचरा टाकणार्‍यांवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने अट्रावल ग्रामपंचायत च्या कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ग्रामपंचायतीने १५ दिवसाच्या आत ग्रामपंचायतीने माझ्या घरासमोर व बाजूस असलेल्या घाणीचा कचरा तात्काळ सफाई करून स्वच्छता न केल्यास आपण यावल पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा हेमचंद्र चौधरी यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

Protected Content