जाणून घ्या…विश्वविजेता संघाची किती असणार मालमत्ता

wold cup

लंडन वृत्तसंस्था । इंग्लंडमधील आयसीसी वर्ल्ड कप 2019 विश्वचषक आता अखेरच्या टप्प्यामध्ये पोहोचला आहे. तीन सामन्यांनंतर समजेल कोण असणार विश्वविजेता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना मंगळवारी रंगणार आहे. कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच विश्वविजेता संघास किती मालमत्ता मिळणार आहे.

याबाबत माहिती अशी की, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी होणारा उपांत्य फेरीचा सामन्यावर पावसाचे सावट आहे. British MET departmentच्या माहितीनुसार सामन्या दरम्यान ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी पावसाची शक्यता 50 टक्के आहे. त्यामुळे सामना थोडा उशीरा सुरू होऊ शकतो. योगायोग म्हणजे साखळी फेरीत उभय संघांमधील सामना पावसामुळे रद्द झाला होता. हा सामना जर रद्द झाला तर भारतीय संघाला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळू शकते.

जो संघ विश्वचषक जिंकेल त्यांना 28 कोटी रुपये मिळतील. उपविजेत्या संघाला 14 कोटी रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. उपांत्य फेरीत जे संघ पराभूत होतील, त्यांना प्रत्येकी 5.5 कोटी रुपये मिळणार आहेत. भारतीय संघाने यावर्षी मँचेस्टर येथे खेळलेल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवले आहेत. येथे भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर डकवर्थ लुईस नियमानुसार 89 धावांनी विजय मिळवला होता, दुसऱ्या लढतीत वेस्ट इंडिजवर 125 धावांनी मोठा विजय मिळवला होता. भारतीय संघाने या मैदानावर आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी 5मध्ये विजय मिळवला आहे. उर्वरित 5व्या सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला होता. 1999च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानवर 47 धावांनी विजय मिळवला होता, तेच 1983च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी फेरीत वेस्ट इंडिजला नमवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डवर आतापर्यंत 51 सामने झाले आहेत. येथे सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. त्यांनी याच वर्षी अफगाणिस्ताविरुद्ध 6 बाद 397 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाचा क्रमांक येतो. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध 5 बाद 336 धावा केल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका ( 6 / 325) आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे एकच सामना खेळला आहे. 1975 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 60 षटकांत 230 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडने 58.5 षटकांत 6 विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले होते.

Protected Content