यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील पाडळसा येथील पत्रकार प्रभाकर तायडे यांची जनकल्याण फाउंडेशन (कार्यक्षेत्र संपूर्ण भारत) या जनकल्याण फाउंडेशनच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव व संचालक तथा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्रीकांत मोरे यांच्या संमतीने महाराष्ट्र महासचिव डॉ. रविंद्र सूर्यवंशी व ह्यूमन राइट्स उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिपक पाटील यांच्या शिफारशीनुसार सर्वांसाठी हक्काचं व्यासपीठ जनकल्याण फाउंडेशन अंतर्गत ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन संघ, यावल तालुका उपाध्यक्षपदी प्रभाकर विष्णू तायडे यांची नियुक्ति करण्यात आली आहे. या निवडीबद्दल मित्रपरिवाराच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे.