पिंपरी-चिंचवड मनपाच्या धर्तीवर आर्थिक मदत द्या

भडगाव, प्रतिनिधी । राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे नाभिक समाजवर उपासमारीची वेळ आली आहे. यातुन सावरण्यासाठी पिपरी-चिंचवड महानगरपालीकेच्या धर्तीवर नाभिक समाजाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी  नाभिक समाज विकास मंडळाच्यावतीने भडगाव नगरपरीषद प्रशासक तथा प्रांतधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊन जाहीर करताना मुख्यमंत्री यांनी लॉकडाऊनमुळे बाधित होणाऱ्या इतर व्यवसायीक घटकांना मदत जाहीर केली. मात्र सलुन व्यवसाय करणारे नाभिक बांधवाना मदतीपासुन वंचित ठेवत नाभिक समाजावर अन्याय केला आहे. लॉकडाऊनमुळे नाभिक बांधवाचा सलुन व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाजावर आज उपासमारीची वेळ आली आहे. काही समाज बांधव खचुन जात आत्महत्येचा मार्ग स्विकारत आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता शासनाकडुन सातत्याने लॉकडाऊन वाढविले जात आहे. तसेच भविष्यात सलुन व्यवसाय सुरु झाला; तरी कोरोनाच्या भितीमुळे सलुन व्यवसाय पुन्हा पुर्ववत जोमाने सुरु होईल की नाही यात शंकाच आहे. यामुळे आम्ही जगायचे कसे ? हा प्रश्न आमच्या समोर उभा आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पिपरी-चिंचवड महानगर पालिकेने आर्थिक दुर्बल घटक म्हणुन तेथिल नाभिक बांधवाना आर्थिक मदत जाहीर केली आहे.  त्या धर्तीवर भडगाव नगरपरीषद फंडातुन नाभिक बांधवाना मदत द्या अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदन प्रांतधिकारी तथा प्रशासक राजेद्र कचरे यांच्या वतीने नगरपरीषद मुख्यधिकारी विकास नवाळे यांनी स्विकारले. याच आशयाचे निवेदन आ. किशोर पाटील यांना १० दिवसापुर्वी देण्यात आले होते. आ. किशोर पाटील यांनी सदरचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवुन नाभिक बांधवाचा मागणी बाबत विचार व्हावा असे कळविले आहे. याप्रसंगी  नाभिक समाज विकास मंडळाचे अध्यक्ष संजय पवार (पत्रकार), उपाध्यक्ष भरत चव्हाण, सचिव हिलाल नेरपगारे, कार्यकारणी सदस्य शिवाजी शिरसाठ, प्रभाकर नेरपगारे, सुभाष ठाकरे,  दिलीप वेळीस,  तुळशीदास निकम, नितिन शिरसाठ आदि उपस्थित होते.

Protected Content