पाचोऱ्यात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान

WhatsApp Image 2019 03 08 at 1.48.04 PM

पाचोरा (प्रतिनिधी)। शारदा इंग्लिश मेडियम स्कूल येथे जागतीक महिला दिनानिमित्त सर्व स्तरावरील महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुचिता वाघ, आई पुरस्काराने सन्मानित मिनाक्षी पांडे या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. नगरसेविका हर्षदा जडे, संगीताताई पाटे, संगीताताई पगारे, निलीमाताई पाटील, नगरसेवक विकास पाटील, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पांडे आदी उपस्थित होते.

यावेळी महिला सरपंच तसेच प्रशासकीय अधिकारी यांचा शाळेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील विविध क्रिडा प्रकारातील विजयी विद्यार्थी तसेच विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रमुख अतिथी सुचिताताई वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या भाषणातून महिलांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला त्यांनी सांगितले की, आजची महिला सक्षम असून त्यांच्या सूप्त कलागुणांना वाव देणं गरजेचे असल्याचे सांगितले तसेच घरातील व समाजातील सहकार्याने महिलांना प्रेरणा मिळते असे मत व्यक्त केले. तर तहसीलदार साहेब यांनी महिलादिनानिमी उपस्थित सर्व महिलांचे शब्दसुमानांनी स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की पुरुष हे स्त्रीयांकडे दुर्लक्ष करत आहे, तसेच मुलं सक्षम होतात तेव्हा आईवडीलांकडे दुर्लक्ष करतात असेही त्यांनी सांगितले, याप्रसंगी त्यांनी संत ज्ञानेश्वर, यशोदा माऊली, व समाजातील सर्व विद्वान महापुरुषांचे उदाहरण दिले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
सस्थेचे चेअरमन प्रदीप पांडे यांनी महिला या पूजनीय असून त्यांचा सत्कार व सन्मान व्हावा असे मत मांडले. शाळेचे प्राचार्य डी.ए. पाटिल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा परिधान करून उपस्थित पालकांना मनोरंजीत केले तसेच अनेक प्रकारची भाषणे तसेच गणी, नाटिका सादर करण्यात आली. यावेळी पालक व महिला वर्ग हे विशेष उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडेलवाल व येवले मॅडम यांनी केले,कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी स्वस्थेचे सचिव निलेश पांडे, शाळेचे पर्यवेक्षक किरण बोरसे यांच्यासह सर्व शिक्षकांनी विशेष योगदान दिले.

Add Comment

Protected Content