पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चात सहभाग-अमोल शिंदे (व्हिडीओ)

पाचोरा प्रतिनिधी | विविध मागण्यासाठी पाचोरा-भडगाव येथील हजारो शेतकरी हे उद्या १ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या भाजपा किसान मोर्चात सहभाग नोंदवून आपल्या समस्या माडणार आहे. अशी माहिती तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तालुक्यात  गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली. याचा  अनेक शेतकऱ्यांना जबर फटका बसला. याची झळ अध्याप सोसावी लागत असताना महावितरण कंपनीकडून ट्रान्सफार्मर वीज पुरवठा खंडित करून पुन्हा जोडणी करीता सक्तीची वीज वसुली करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. यापाश्वभूमीवर उद्या १ नोव्हेंबर रोजी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात, भारतीय जनता पार्टीच्या वतीने व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा किसान मोर्चात पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चात सहभाग नोंदवून आपल्या समस्या माडणार आहे. यात प्रमुख मागण्या ऐन खरीप हंगामाच्या शेवटी व रब्बीच्या सुरुवाती साठी पाण्याची नितांत गरज असते. यामुळे ट्रान्सफार्मर वीज पुरवठा खंडित करून पुन्हा जोडणी करीता सक्तीची वीज वसुली थांबवावी, शेतीला वीज पुरवठा करणारे ट्रांन्सफार्मर नादुरुस्त झाल्यावर त्वरित बदलून मिळावे. व त्यासाठी सक्तीचे वीज बिल वसुली करु नये. तसेच  रात्री अपरात्री होणाऱ्या शेती वीजपुरवठा धोरणात तात्काळ बदल करून रात्री ऐवजी दिवसा शेतीला नियमित वीज पुरवठा करण्यात यावा, अतिपावसामुळे जाहीर झालेल्या तुटपुंज्या मदत ऐवजी त्यात वाढ करून दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई रक्कम जमा करावी, पिक विमा योजना सन २०२०- २०२१ अंतर्गत कापूस, उडीद, मुंग, सोयाबीन, इ. नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांची रक्कम तात्काळ बँक खात्यात जमा करण्यात यावी, सन २०१८ व सन – २०१९ मध्ये आलेल्या चक्रीवादळ मुळे झालेल्या नुकसान भरपाईची प्रलंबित रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करावी, भडगाव तालुक्यात जून २०१९ मध्ये झालेल्या वादळी वारा व गारपिटीची तसेच मार्च २०२१ मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ बँक खात्यात जमा करण्यात यावी, पाचोरा व भडगाव तालुक्यात जनावरांवरिल लम्पी या आजाराचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रत्येक गाव पातळीवर जाऊन गुरांचे लसीकरण करण्यात यावी. आदी मागण्यासाठी हे मोर्चा काढण्यात येणार आहे. या तालिबानी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात सुलतानी निर्णय घेतल्याने यंदाची दिवाळीही शेतकरी बांधवांच्या आयुष्यातील अंधारमय व काळोख ठरणार आहे. असे अमोल शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस तथा जि.प. सदस्य मधुकर काटे, जिल्हाचिटणीस सोमनाथ पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख हिम्मतसिंग निकुंभ, शहराध्यक्ष रमेश वाणी, किसान मोर्चा पाचोरा तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष यशवंत पाटील, सरचिटणीस गोविंद शेलार, संजय पाटील, दीपक माने,भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे, सुनील पाटील, भैया ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content